2020-09-28T07:17:28
जागतिक कर्णबधीर दिवस २८ सप्टेंबर २०२०.📢📢📢 भारतात सध्या १.८ कोटी लोक कर्ण बधीर असून त्यापैकी २०लाख मुले आहेत. या पैकी १२ लाख मुले प्राथमिक शाळेत शिक्षण पूर्ण करतात तर उर्वरीत ८लाख मुले शाळा सोडतात. संपूर्ण जगातील हाच आकडा ४६.६ कोटी म्हणजेच लोकसंख्येच्या ५.६ % इतका प्रचंड आहे. बरिरेपणाच्या विविध कारणांपैकी काही टाळता येऊ शकतात, तर काही टाळणे शक्य नसते. कानात मळ होणे, जंतुसंसर्ग होणे, इजा होणे, कौटुंबिक हिंसाारातून होणारी इजा, मोठ्या आवाजात सतत काम केल्याने होणारा (noise induced ) असे टाळण्याजोगे प्रकार आहेत. परंतु गुंसुत्रदोषामुळे होणारे, आनुवंशिक बहिरेपणा टाळता येत नाही. असे असले तरी त्याही रुग्णांना उत्तम डिजिटल श्रवणयंत्र लाऊन उत्तम ऐकू येऊ शकते. बहिरेपणा चा सर्वात घटक परिणाम मुलाच्या वाचा व भाषा विकासावर होतो. वय वर्ष १-५ हे वाचा भाषा विकासासाठी महत्त्वाचे ठरतात.म्हणूनच श्रवण दोषाचे निदान या आधीच होणे गरजेचे असते. बहिरेपणा चा आर्थिक बोजा. बहिरेपणा चा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम मुख्यत्वे ४ घटकांमध्ये विभागला जातो. १. अश्या रुग्णांना आरोग्यसेवा पुरविण्यात होणारा खर्च. उदा. कर्णरोग उपचार, शल्यक्रिया, श्रवणयंत्र पुरविणे. २. दुसरा महत्त्वाचा बोजा, अश्या मुलांसाठी शिक्षण प्रणाली विकसित करण्यावर पडतो. ३. तिसरा दृश्य परिणाम हा कर्ण बधीर लोकांची उत्पादकता, कौशल्य यावर होणाऱ्या परिणामामुळे, रोजगार जाणे, सक्तीची लवकर होणारी सेवानिवृत्ती या स्वरूपात होतो. ४. कर्ण बधीर पणाचा सर्वात मोठा पण अदृश्य परिणाम होतो तो या व्यक्तीच्या सामाजिक वर मानसिक आ यामांवर. बहिरेपणा मुळे येणारे नैराश्य, अविकसित संवादकौशल्य , अंतरमग्नता यामुळे मनुष्यबळाची होणारी हानी न मोजता येण्यासारखी आहे. दुर्दैवाने अंध त्वला ज्या प्रकारे आधाराचा हात मिळाला, तसा बहिरेपणा ला मिळाला नाही. अंध व्यक्तीला सहानुभूती, तर कर्णबधीर व्यक्तीचा उपहास बघायला मिळतो. भारतात अंधत्व निवारण कार्यक्रम ५० वर्षापूर्वी सुरू झाला, तर बहिरेपणा निर्मूलन कार्यक्रम अजूनही शिशु अवस्थेत आहे. सरकारी कार्यक्रम व नियम. अपंगत्व कायद्यानुसार व्यक्तीला दोन्ही कांनाना ६० dB पेक्षा जास्त बहिरेपणा असेल तर त्याला अपंगत्व certificate मिळते. परंतु हा निकष खूप जास्त दोष असलेल्यानच लागू पडतो. बहुतांश लोक यापेक्षा कमी पण श्रावणात पुष्कळ अडचण येत असलेले असतात. ते या सगळ्या सोयींपासून वंचित राहतात. शिवाय असे प्रमाणपत्र मिळवायला असणारा भ्रष्टाचार मध्ये आडवा येतो. आणि येथेच तुमच्या माझ्या मदतीची गरज भासते. बहिरेपणा विरुद्ध लढा काही सोप्या अस्त्रानी लढला जाऊ शकतो. १. प्रौढ रुग्णांचे लवकर निदान करणे. २. बहिरेपणा वर औषधे व शस्त्र क्रिये द्वारे वेळीच उपचार. ३. टाळता ना येण्याजोग्या बहिरे पणा साठी श्रवण यंत्र. ४. जन्मजात मुलांची बहिरेपणा चाचणी. ५. अश्या मुलांच्या वाचा भाषा सुधारणेसाठी प्रशिक्षण. आम्ही साई दीप ई एन टी हॉस्पिटल व डी व्हीं जोशी चॅरिटेबल फाऊंडेशन या लढ्यासाठी कटिबध्द आहोत. आम्ही सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना निदान/ तपासणी, औषधे, शस्त्र क्रीया व श्रवण यंत्र देऊन विकलांगतेवर मात करण्यासाठी हातभार लावतो. भविष्यात कर्णबधीर मुलांना मुख्य प्रवाहात आणण्ासाठी प्रशिक्षण संस्थेची सूरवात करण्याचे देखील प्रयोजन आहे. या अजस्त्र कामामध्ये आपले आशीर्वाद व मदतीची गरज आहे. आपण सर्वच आमच्या सोबत अथवा आपल्या स्तरावर यात काम करू शकता. अश्या गरजूंना आमच्या पर्यंत पोचवावे ही विनंती. शेवटी येवढेच म्हणावेसे वाटते, " कर्ण बधिरत्वा विषयी कर्ण बधीर होणे टाळू या" सप्रेम डॉ अमोल जोशी साई दीप ई एन टी हॉस्पिटल डी वी जोशी चॅरिटेबल फाऊंडेशन पिंपळे सौदागर ९८९०७०८३६३ ९५४५९८४२८९
Have a question? Ask here!
Required fields are marked *